CoronaVirus उद्धव ठाकरेंना मोठे यश; रेल्वे, लष्कराची रुग्णालये वापरण्यास केंद्राची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 10:38 PM2020-05-06T22:38:06+5:302020-05-06T22:40:32+5:30
येत्या काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारित येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी मागितली होती.
मुंबई : राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. मात्र, तरीही राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमालीचा वाढत असून येत्या काळात गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारित येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी मागितली होती. यास सायंकाळी उशिरा मान्यता मिळाली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, यासाठी केंद्राने एक अट घातली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केली असून रेल्वेसह मुंबई पोर्ट ट्रस्ट, सैन्यासह केंद्राच्या अखत्यारित येणारी हॉस्पिटलमधील आयसीयू वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र, हे आयसीयू बेड शेवटचा पर्याय म्हणून वापरण्यात यावेत अशी अटही घातली आहे.
Union Health Minister has approved Maharashtra Govt's proposal to use ICUs of Defence & Railways hospitals in Mumbai for treatment of #COVID19 positive patients But,he has also instructed that these ICU beds must be used as last available option:Maharashtra Health Min Rajesh Tope pic.twitter.com/LYJ4grRaGX
— ANI (@ANI) May 6, 2020
राज्य सरकारने स्पोर्ट कॉम्प्लेक्स, रुग्णालये, सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांवरील उपचारांची सोय केली आहे. मात्र, भविष्यातील तयारी म्हणून राज्य सरकारने केंद्राकडे ही मागणी केली होती. आज उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत आज राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी ही मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपली? गडकरींची मोठी घोषणा
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले