CoronaVirus वाईन शॉप नाही, मालमत्ता विक्रीतून घसघशीत महसूल; पुण्यातील उद्योजकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:17 PM2020-05-04T17:17:36+5:302020-05-04T17:27:18+5:30
CoronaVirus Lockdown कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना ज्या धीराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहात तो प्रशंसनीय आहे. यावरून महाराष्ट्र सुरक्षित हातात असल्याची खात्री होत असल्याचे पुण्यातील उद्योजकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुंबई : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाले आहे. यामुळे सर्व व्यवहार ठप्प असल्याने केंद्रासह राज्यांचे उत्पन्ना बुडाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी आजपासून उत्पन्न सुरु करण्यासाठी दारू विक्रीला परवानगी दिली आहे. यावर पुण्याच्या उद्योजकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दारुपेक्षाही जास्त उत्पन्न मिळवून देणारा उपाय सुचविला आहे.
पुण्यातील एका रिअल इस्टेट एजन्सीचे संचालक संजय डागा यांनी याबाबतचे पत्र ठाकरे सरकारला लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सरकारच्या फायद्याचे गणित मांडले आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या कामाची स्तुतीही केली आहे. कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना ज्या धीराने कोरोना संकटाचा मुकाबला करत आहात तो प्रशंसनीय आहे. यावरून महाराष्ट्र सुरक्षित हातात असल्याची खात्री होत असल्याचे डागा यांनी म्हटले आहे.
याचबरोबर राज्य सरकारने घेतलेल्या आजपासून दारू विक्रीच्या निर्णयापेक्षा मालमत्ता विक्री कशी फायदेशीर आहे हे त्यांना पटवून दिले आहे. एखादा ७० लाखांचा फ्लॅट विकला तर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि जीएसटी असे एकूण ८ लाख रुपये सरकारी तिजोरीला मिळतील. मात्र, दारुविक्रीतून ग्राहकामागे १ हजार रुपये प्रमाणे ८ लाख रुपयांचा महसूल मिळविण्यासाठी ८०० लोकांना घराबाहेर पडावे लागणार आहे. मात्र, मालमत्ता विक्रीसाठी केवळ १ ग्राहक असणार आहे. यावरून जास्त जोखमीचे काय असेल याचा तुम्हीच विचार करावा असे आवाहन डागा यांनी केले आहे.
याचबरोबर त्यांनी सरकारच्या बंदीमधील त्रूटीही दाखविली आहे. लॉकडाऊन काळात बिल्डर घरे बांधू शकतो, मात्र विक्रीला परवानगी नाही. असा नियम घातल्यास त्या बिल्डरने पुरवठादार, कंत्राटदार आणि मजुरांना पैसे कुठून द्यायचे, असा सवालही केला आहे.
बिल्डरांना बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज २ टक्क्यांनी कमी करावे. अर्थव्यवस्था रिअल इस्टेट क्षेत्रावरच अवलंबून आहे. त्यासाठी बिल्डरांना सवलत मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याचबरोबर डांगा यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कामाबाबतही आभार मानले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला
कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दाराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले