Coronavirus: मास्क, हँण्ड वॉश रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन द्या: चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:47 AM2020-03-12T10:47:16+5:302020-03-12T10:54:55+5:30
लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणे परवडणारे नाही.
मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका देशात वाढताना पाहायला मिळत आहे. बुधवारी सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 60 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांत या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्वात जास्त परिणाम केरळमध्ये दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असून ,आतापर्यंत 11 रुग्ण आढळून आली आहे. त्यामुळे परिस्थती लक्षात घेऊन सरकारने मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
विधानसभेत बोलताना पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस महाराष्ट्रात सुद्धा आला असून पुण्यात रुग्ण आढळून आली आहे. तर लोकांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मास्क आणि हँण्ड वॉश हे सर्वसामान्य व्यक्तींना घेणे परवडणारे नाही. त्यामुळे किमान रेशन घेणाऱ्या कुटुंबांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अल्प दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी पाटील यांनी केली.
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, याच्या बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हँण्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. pic.twitter.com/9zoh6B4ky4
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 11, 2020
पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून मंगळवारी पाच असणारी बाधितांची संख्या आता आठवर पोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुण्यात आठ आणि मुंबईत दोन आणि आता नागपूरात एक अशा एकूण 11 व्यक्तींना महाराष्ट्रात कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.