Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 01:47 PM2020-03-20T13:47:15+5:302020-03-20T14:35:36+5:30

Coronavirus: "महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल..."

Coronavirus: MNS appeals to declare 'government curfew' in the Maharashtra rkp | Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

Coronavirus: राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा, मनसेचे आवाहन

Next
ठळक मुद्देराज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.शुक्रवारी कोरोनाच्या नवीन 3 रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे.

मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाच्या नवीन 3 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज पडल्यास संपूर्ण राज्यात सरकारी कर्फ्यू जारी करावा, असे आवाहन सरकारला केले आहे. 

राजू पाटील म्हणाले, "महाराष्ट्राची इटली होऊ द्यायची नसेल,आणि जर जनतेला केलेले 'स्वयंशिस्ती'चे आवाहन काम करणार नसेल तर सरकारला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. गरज पडल्यास संपूर्ण राज्यात 'सरकारी कर्फ्यू' जाहीर करावा." 

चीनमधील व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली आहे. तसेच, पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यध्य राज ठाकरे यांनी कावल सोशल मीडियाद्वारे मनसेच्या कार्यकर्त्यांना कोरोनाबाबत विविध सूचना दिल्या आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितले.

महाराष्ट्र सैनिकांनी पुढील गोष्टी करायला पाहिजेत अश्या सूचना देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत-
१) आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.
२) आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.
३) आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.
४) आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे.
५) आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.
६) ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.
७) महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी.
८) सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या.
९) आणि हो, ह्या सगळ्यात तुम्ही तुमची, तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्या. बाहेर जाताना मास्क लावा, 'सॅनिटायझर'ने हात स्वच्छ करत रहा आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचं आयुष्य हे माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी मोलाचं आहे हे विसरू नका.

Web Title: Coronavirus: MNS appeals to declare 'government curfew' in the Maharashtra rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.