CoronaVirus: “रेमडेसिवीरच्या केवळ घोषणा, कुणाकडे टाहो फोडायचा, हे सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 07:08 PM2021-04-27T19:08:27+5:302021-04-27T19:11:57+5:30
CoronaVirus: रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कमतरतेवरून मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भयानक स्थिती संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून हा तुटवडा लवकरच भरून निघेल, असे आश्वासन सातत्याने दिले जात असले, तरी अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मनसेनेराज्य सरकारवर टीका केली आहे. (coronavirus mns gajanan kale criticises thackeray govt on remdesivir injection)
रुग्णांच्या नातेवाईकांना अजूनही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाहीय. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड वणवण होत आहे. अनेक मेडिकल बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या तासंतास रांगा लागल्या आहेत. तर काही ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
काळ्या बाजारात उपलब्ध नाही आणि शासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन पुरवत नाहीत..
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 27, 2021
आता रुग्णांच्या नातेवाईकांनी काेणाकडे टाहाे फाेडायचा ते ही एकदा सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावे ..
रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा
आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकाही खाजगी रुग्णालयला ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून एकही रेमडेसिवीर देण्यात आले नाही. म्हणजेच ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या मनपातील खाजगी रुग्णालयांनाही एकही रेमडेसिवीर आज मिळाले नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याबाबतच्या फक्त घोषणा करण्यात आल्या, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे. तसेच काळ्या बाजारात उपलब्ध नाही आणि शासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन पुरवत नाहीत. आता रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा तेही एकदा सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावे, या शब्दांत दुसऱ्या एका ट्विटमध्ये संताप व्यक्त केला आहे.
मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र
दरम्यान, ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, बेड, औषधे या स्वरूपात इतर देशांतून मदत केली जात आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे. अलीकडेच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. तर दुसरीकडे मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.