Coronavirus: राज्यात तिसऱ्या दिवशीही आढळले पाच हजारांहून अधिक नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:20 AM2020-06-30T02:20:29+5:302020-06-30T02:20:40+5:30
सोमवारी २ हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ८८ हजार ९६० जण कोविडमुक्त झाले आहेत
मुंबई : राज्यात सलग तिसºया दिवशी पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार २५७ नवे कोरोना रुग्ण आढळले तर १८१ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ७ हजार ६१० मृत्यू झाले आहेत.
सोमवारी २ हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ८८ हजार ९६० जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्याची एकूण रुग्णसंख्या १ लाख, ६९ हजार, ८८३ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.३७ टक्के असून मृत्यूदर ४.४८ टक्के आहे. राज्यात १८१ जणांचा मृत्यू झाला असून यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित १०३ मृत्यू मागील काळातील आहेत.