CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:56 PM2021-04-23T17:56:23+5:302021-04-23T18:16:43+5:30
CoronaVirus Death : धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वच ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त होताना दिसून येत आहे, हे चित्र खूपच भयावह आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवडा, कमी बेड्सची उपलब्धता असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील माय-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे ठाकरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि वडीलही गंभीर संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल आहेत. इतकंच नाही तर पत्नी आणि मुलालाह कोरोनाची लागण झाली आहे. अशा स्थितीत कुटुंबाचा आधार असलेल्या सागरचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सागरचं फक्त ३४ वर्षे होतं. इतक्या कमी वयात कोरोनानं या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे लोकांच्या मनात अधिकचं भीतीचं वातावरण पसरलं आहे.
अशी झाली सुरूवात
पालघरमधील ऐनशेत गावात वास्तव्यास असलेल्या सरिता सदानंद ठाकरे यांना आणि त्यांच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर पतीला रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये तर सरिता यांना भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सरिता यांचा उपचारादरम्यान १० एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव
धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या आई मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सागरला पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वाडा तालुक्यात कोरोना व्हायरसमुळे हा 60 वा बळी असून कोरोनवर उपचार होईल, अशा अत्याधुनिक व्यवस्था वाढवण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी