CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:11 AM2021-07-28T10:11:26+5:302021-07-28T10:11:57+5:30

धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine | CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतील डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण; लस घेऊनही संपूर्ण कुटुंब संक्रमित!

googlenewsNext

मुंबई- कोरोना संक्रमणासंदर्भात एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे एका डॉक्टरला तिसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धक्कादायक आणि चिंतावाढवणारी गोष्ट म्हणजे या डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मुलुंड भागात राहणाऱ्या या डॉक्टरचे नाव सृष्टी हलारी असे आहे. गेल्यावर्षी जून 2020 पासून आतापर्यंत तब्बल तीनवेळा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याच वर्षी लस घेतली आहे. याहुनही धक्कादायक बाब म्हणजे, या डॉक्टरचे संपूर्ण कुटुंब, लस घेतली असतानाही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. (CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine)

Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर

डॉ. सृष्टी हलारी यांना तीनवेळा कोरोनाची लागण झाल्याने आता त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी एकत्रित करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या मते, त्यांना तिसऱ्यांदा संक्रमण होण्यामागे, कोरोना व्हेरिएंटपासून, इम्यूनिटी लेव्हलपासून ते अगदी चुकीच्या रिपोर्टपर्यंत अनेक कारणे असू शकतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, कोरोना लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, असे रुग्ण लवकरच बरेही होतात.

डॉ. सृष्टी हलारी यांनी दिली महत्वाची माहिती -
डॉ. सृष्टी हलारी यांनी सांगितले, "मी पहिल्यांदा कोरोना संक्रमित झाले, कारण एक सहकारी कर्मचारी संक्रमित आढळला होता. यानंतर मी माझी पोस्टिंग पूर्ण केली आणि पीजी अ‍ॅडमिशन परीक्षेआधी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.  आणि घरीच थांबले. जुलै महिन्यात माझे संपूर्ण कुटुंब कोरोना संक्रमित झाले होते." 

CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात

तसेच, सृष्टीवर उपचार करत असलेल्या डॉ. मेहूल ठक्कर यांनी सांगितले, की "मे महिन्यात झालेले दुसरे संक्रमण जुलै महिन्यात पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट झाले असावे अथवा आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल, असेही होऊ शकते.

Read in English

Web Title: CoronaVirus Mumbai doctor got corona infected for third time has taken both doses of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.