CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:45 PM2021-05-07T15:45:46+5:302021-05-07T15:48:52+5:30

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे.

coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation | CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

CoronaVirus: “मोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत; काहीच नियोजन नाही”  

Next
ठळक मुद्देमोदी सरकाने आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायतहिंसेचं कोणीच समर्थन करत नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत - मलिक

मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोना उद्रेकामुळे कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. केंद्र सरकारने आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवायला हवी. त्यातून मार्ग काढाणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा खोचक टोला मलिक यांनी लगावला.  

कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

आधी अधिकार घेतले, आता हात झटकतायत

विरोधक जे बोलत होते, तेच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी बोलत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा मोठा तुडवडा आहे. पंतप्रधान मोदींचे काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे. तसेच पॉझिटिव्ह रेट केवळ गोवा नाही, तर यूपीतही सारखाच आहे. लाखो रुग्ण आपले प्राण गमावतील, अशी परिस्थिती आहे. माझी मागणी आहे. सर्व देशातील नेत्यांची बैठक पंतप्रधान मोदी यांनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून येत असलेल्या सामानाने वाटपही होत नाही, असा दावाही यावेळी मलिक यांनी केला.

“नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला

हिंसेचं कोणीच समर्थन करत नाही

भाजप फेक व्हिडिओ शेअर करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची बदनामी करत आहेत. बंगालमधील हिंसेच कोणीच समर्थन करत नाही. किसान सम्मान निधी देऊ अशी घोषणा भाजपने केली होती. आता ममता दिदींनी तत्काळ तो निधी देण्याची मागणी केली आहे. आता केंद्राची जबाबदारी आहे, असे मलिक यांनी सांगितले. याशिवाय, रवींद्रनाथ टागोर यांची जयंती सर्वजण साजरी करत आहेत. टागोर हे जाती, धर्माच्या पालिकडे होते. पंतप्रधान मोदींनी हा लूक बंगाल निवडणुकीसाठी केला होता. आता त्यांनी त्यांचे विचारही घेतले पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला. 

 

Web Title: coronavirus ncp nawab malik criticised pm modi and centre govt over corona situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.