Coronavirus: कोरोनाबळींचा नवा उच्चांक, राज्यात दिवसभरात २४५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 02:44 AM2020-07-01T02:44:44+5:302020-07-01T02:44:56+5:30

४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला.

Coronavirus: New high of coronaviruses, 245 deaths in a day in the state | Coronavirus: कोरोनाबळींचा नवा उच्चांक, राज्यात दिवसभरात २४५ मृत्यू

Coronavirus: कोरोनाबळींचा नवा उच्चांक, राज्यात दिवसभरात २४५ मृत्यू

Next

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची वाढतच असून मंगळवारी दिवसभरात तब्बल २४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

४ हजार ८७८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४५ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना (कोविड) रुग्णांची संख्या १ लाख ७४ हजार ७६१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा ७ हजार ८५५ झाला. राज्यात विविध रुग्णालयांत ७५ हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ५२.०२ टक्के असून मृत्यूदर ४.४९ टक्के आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८८ टक्के लक्षणविरहित आहेत. तर चार टक्के रुग्ण गंभीर स्थितीत असून आठ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.
२४५ मृतांपैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. ९५ मृत्यूंमध्ये मुंबईतील ३६, ठाणे ३, ठाणे मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा ४, भिवंडी निजामपूर मनपा ३, वसई-विरार मनपा २, नाशिक २ , नाशिक मनपा १, जळगाव ५, पुणे १, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर मनपा २, कोल्हापूर १, रत्नागिरी १, औंरगाबाद २, औरंगाबाद मनपा ११, लातूर १, अकोला २, अकोला मनपा १ येथील रुग्णांचा समावेश आहे.

११ ते २० वयोगटात १०,६९९ रुग्ण
शून्य ते १० वर्षांमधील साडेपाच हजारांहून अधिक बालकांना कोरोना झाला आहे. तर ११ ते २० वयोगटातील १० हजार ६९९ मुला- मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ ते ४० वयोगटातील ३२ हजारांहून अधिक तर २१ ते ३० वयोगटातील ३० हजार कोरोनाचे रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे आणखी ३६ बळी
मुंबई : मुंबईत मंगळवाारी दिवसभरात ८९३ रुग्णांचे निदान झाले असून ३६ मृत्यू झाले आहेत. मुंबईत एकूण रुग्णसंख्या ७७ हजार ६५८ असून ४ हजार ५५६ मृत्यू झाले आहेत. सध्या २८ हजार ९२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Web Title: Coronavirus: New high of coronaviruses, 245 deaths in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.