CoronaVirus News : राज्यात १ लाख ३५ हजार कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:18 AM2020-06-23T04:18:27+5:302020-06-23T04:19:14+5:30
CoronaVirus News : सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४९.८६ टक्के असून मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे.
मुंबई : राज्यात सोमवारी ३ हजार ७२१ रुग्णांची नोंद झाली असून ६२ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ झाली असून बळींचा आकडा ६,२८३ झाला आहे. राज्यात दिवसभरात १,९६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत ६७ हजार ७०६ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ४९.८६ टक्के असून मृत्यूदर ४.६३ टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात ६१ हजार ७९३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात नोंद झालेल्या ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ५१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या काळातील आहेत. ६२ मृत्यूमध्ये मुंबई २०, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भार्इंदर मनपा १३, पालघर १, मालेगाव मनपा ८, पुणे १, पुणे मनपा ९, पिंपरी चिंचवड मनपा १, औंरगाबाद ४, लातूर १, अकोला मनपा २ अशांचा समावेश आहे. तर ५१ मृत्यू दैनंदिन स्वरूपात न दाखविता त्यांचा तपशील प्रगतिपथावर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६७ हजार ५८६ झाली आहे. तर सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २९ हजार ७२० एवढी आहे. मुंबईत आतापर्यंत ३४,१२१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ कोविड नमुन्यांपैकी १७.२४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आहेत. तर सध्या ६ लाख १ हजार १८२ लोक होम क्वारंटाइमध्ये असून २६,९१० लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
>मुंबईत ६७ हजार ५८६ रुग्ण
मुंबई : मुंबईत दिवसभरात १ हजार १२८ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्या ६७ हजार ५८६ झाली आहे, तर सोमवारी २० मृत्यू झाले असून, बळींचा आकडा ३७३७ झाला आहे. दिवसभरात ६२८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३४ हजार १२१ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्णदुपट्टीचा दर ३७ दिवसांवर गेला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्के झाले आहे. तर गेल्या आठवड्याभरात कोविडवाढीचा दर १.८८ टक्के आहे. रविवारपर्यंत मुंबईत कोविडच्या २ लाख ९१ हजार ५९० चाचण्या झाल्या आहेत.
शहर उपनगरातील पालिका रुग्णालयांत सोमवारी ८६३ कोविड संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ हजार ८७० संशयित रुग्णांना रुग्णालयांत भरती करण्यात आले आहे.