CoronaVirus News : एसटी महामंडळाचे पोर्टल विकसित होतोय; १० हजार बस धावणार, अडकलेल्या नागरिकांना सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:30 PM2020-05-08T22:30:20+5:302020-05-08T22:30:58+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : एसटी महामंडळाकडून गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यासह ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. 

CoronaVirus News: 10,000 ST buses will run, release stranded citizens rkp | CoronaVirus News : एसटी महामंडळाचे पोर्टल विकसित होतोय; १० हजार बस धावणार, अडकलेल्या नागरिकांना सोडणार

CoronaVirus News : एसटी महामंडळाचे पोर्टल विकसित होतोय; १० हजार बस धावणार, अडकलेल्या नागरिकांना सोडणार

Next
ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे.

मुंबई :  लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध भागात नागरिक अडकले आहेत. या नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाच्या १० हजार बस धावणार आहेत. त्यासाठी एसटी महामंडळाकडून गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. यासह ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. 

यापोर्टल मार्फत अर्जदार एकटा किंवा दोन ते तीन व्यक्तींचा छोटा गट असला तरीही त्याची नोंद करणे सहज शक्य होणार आहे. याद्वारे ऑनलाईन बुकिंग करून एका ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी जाता येणार आहे. १० मे पर्यंत पोर्टल विकसित होण्याची शक्यता आहे. यासाठी काम युद्ध पातळीवर सुरु आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी  दिली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर,पर्यटक यांच्यासाठी पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक एकाच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यामुळे या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचवले जाणार असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.   

राज्यात विविध जिल्हात अडकलेल्या मजुरांना घरी सोडण्याची जबाबदारी महामंडळाने घेतली आहे. आतापर्यत अनेक मजुरांनी २५ जणांचा गट तयार करून आणि त्यानंतर पोलिसांची परवानगी घेऊन बस आरक्षित केली आहे. अनेक गटांनी प्रत्येकी खासगी बसला अतिरिक्त पैसे देऊन बाहेर राज्यात जात आहे. त्यामुळे मजुरांची,प्रवाशांची आर्थिक पिळवणुक होत आहे. परंतु आता या पोर्टलमुळे या गोष्टी सहज शक्य होणार अशी माहिती सुद्धा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशी करावी बुकिंग 
प्रवाशांना घरी जायचं असेल तर आता गट तयार करावे लागत होते. मात्र आता पोर्टलमुळे तुम्हाला थेट अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आधार कार्ड, पोलीस परवानगीसह इतर कागदपत्र  आणि गंतव्य स्थानकाची माहिती नोंदवु शकतात. पोर्टल अशा अर्जाचे एकत्रिकरण करेल आणि विविध गंतव्यस्थानासाठी अजर्दारांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर त्या-त्या भागातील प्रवाशांचे गट तयार करुन त्यांना पुढील प्रवासासाठी बसची माहिती दिली जाईल.

आगार-दुरध्वनी क्रमांक  
पोर्टलला एका हेल्पलाइनद्वारे जोडले जाणार आहे.ज्यावर प्रवासी आपल्या शंका आणि त्यांची वैयक्तिक माहिती देऊ शकतात. या हेल्पलाईनवर अडचणी शंकांचे निरासण केले जाणार आहे त्यासाठी .मुंबईतील नियंत्रण कक्ष आगार दुरध्वनी क्रमांक,  विद्याविहार ०२२-२५१०११८२, मुंबई आगार ०२२-२३०७२३७१, परळ आगार ०२२-२४३०४६२०, कुर्ला नेहरु नगर आगार ०२२-२५५२२०७२, पनवेल आगार ०२२-२७४८२८४४  आणि  उरण आगार ०२२-२७२२२४६६
 

Web Title: CoronaVirus News: 10,000 ST buses will run, release stranded citizens rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.