CoronaVirus News : राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची विक्रमी वाढ, गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 08:57 PM2020-08-11T20:57:34+5:302020-08-11T21:08:47+5:30
आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ८८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ इतकी झाली आहे. तर दिवसभरात २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के इतका आहे.
याचबरोबर, आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
11,088 new #COVID19 cases reported in Maharashtra taking the total number of cases in the State to 5,35,601. There are 1,48,553 active cases and the death toll is at 18,306: State Health Department pic.twitter.com/WnzcdNY3SN
— ANI (@ANI) August 11, 2020