CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:32 AM2020-06-25T06:32:49+5:302020-06-25T06:33:07+5:30

अर्थचक्र वेगाने सुरू करण्यासाठी रेल्वे, बससेवा सुरू करणे गरजेचे आहे.

CoronaVirus News : 57,000 patients in Maharashtra in 24 days; Big cities in trouble | CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत

CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत

Next

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी ४ लाख ५६ हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्याच्या सर्वच शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर येथील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे.

महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५१.६४ टक्के आहे. हे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरी देशाच्या तुलनेत ते कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७१ टक्के आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यातही सरकारला अडचणी येत आहेत. अर्थचक्र वेगाने सुरू करण्यासाठी रेल्वे, बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. पण त्या सुरू झाल्यास संसर्ग अधिक वाढण्याची भीती आहे.
>निर्बंध कधी उठणार?
एकीकडे राज्यात व मोठ्या शहरांत अनलॉकची चर्चा सुरू असतानाच वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करावेत, अशी मागणी काही मंडळी करीत आहेत. त्यामुळे निर्बंध उठणार की वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>येथे स्थिती चिंताजनक
मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर, जळगाव.
>राज्यात ९ मार्च ते २४ जून या काळात कोरोनाबाधितांची संख्या २ वरून १ लाख ४२ हजार ९00 वर गेली. जूनच्या १७ दिवसांत तर ५७ हजारांहून अधिक रुग्ण वाढले.
>कोरोनाबाधितांमध्ये महाराष्टÑ टॉपवर
महाराष्टÑ 139010
दिल्ली 66602
तामिळनाडू 64603
गुजरात 28629
उत्तर प्रदेश 18893
>राज्यातील
टॉप जिल्हे
मुंबई 69528
ठाणे 27880
पुणे २0६८९
पालघर 4028
औरंगाबाद 4511

Web Title: CoronaVirus News : 57,000 patients in Maharashtra in 24 days; Big cities in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.