CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ८१५१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, तर २१३ जणांना मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 09:14 PM2020-10-20T21:14:53+5:302020-10-20T22:07:12+5:30
CoronaVirus News : नवीन ७४२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत १३९२३०८ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या आकडेवारीतही दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१५१ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १६०९५१६ वर पोहचली आहे. तर आज ७४२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत १३९२३०८ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत.
याचबरोबर, राज्यात एकूण १७४२६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८६.०५ टक्के झाले आहे. तर आज २१३ कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले आहेत. आतापर्यंत राज्यात ४२४५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८२,५१,२३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,०९,५१६ (१९.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,३४,६८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,४८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
8,151 new COVID-19 cases reported in #Maharashtra today taking total cases in the State to 16,09,516.
— ANI (@ANI) October 20, 2020
Active cases in the State stand at 1,74,265 while discharged cases are 13,92,308; the death toll is at 42,453, as per State Health Department pic.twitter.com/07hcAlkord