CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:46 AM2020-05-02T05:46:22+5:302020-05-02T05:46:46+5:30

राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात ४५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

CoronaVirus News: 83% patients in the state have no symptoms: Health Minister | CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री

CoronaVirus News: राज्यातील ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत- आरोग्यमंत्री

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. कालपर्यंत १,७७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण २० टक्के आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २००० अतिरीक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीत राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बिड ) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांना आवश्यकत भासल्यास क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होईल, अशी नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितले.
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी होऊन तो ३.५ टक्के एवढा झाला आहे. राज्याचा कोरोना रुग्ण दुपटीचा वेग हा देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात ४५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यात २५ शासकीय २० खासगी प्रयोगशाळा आहे. दररोज ७ हजारांहून अधिक चाचण्यांची क्षमता आहे.
ते पुढे म्हणाले की, राज्यात ७३३ कंटेनमेंट झोन आहेत १० हजार सर्वेक्षण पथके कार्यरत तर ४३ लाख लोकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यात केंद्राच्या निकषानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात आले असून केंद्र शासनच्या सूचनेनुसार राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे रेड झोन मध्ये, १६ आॅरेंज आणि ६ जिल्हे ग्रीन झोन मध्ये आहेत.

Web Title: CoronaVirus News: 83% patients in the state have no symptoms: Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.