CoronaVirus News : चिंता वाढली; महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग, दिवसभरात ८,६४१ नवीन रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:49 AM2020-07-17T03:49:27+5:302020-07-17T06:51:26+5:30
राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली असून बळींचा आकडा ११ हजार १९४ वर पोहोचला आहे.
मुंबई : देशात महाराष्ट्र व तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. दोन्ही राज्यांमध्ये मिळून सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण ४८.१५ टक्के आहे.
महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्ण १ लाख १४ हजार ६४८ आहेत तर तामिळनाडूमध्ये ही रुग्णसंख्या ४७ हजार ३४३ इतकी आहे. त्यामुळे दिवसागणिक प्रशासनावरचा ताण आणि सामान्यांच्या चिंतेत भर पडत आहे.
राज्यात गुरुवारी ८ हजार ६४१ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली,तर २६६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली असून बळींचा आकडा ११ हजार १९४ वर पोहोचला आहे.
63.24% देशात बरे देशामध्ये गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाचे ३२ हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले असून इतकी विक्रमी वाढ प्रथमच झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ लाख ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. तसेच गुरुवारी २० हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झाले आहेत. अशा रुग्णांची प्रमाण ६३.२४ टक्के झाले असून तेदेखील आजवरचे सर्वात जास्त प्रमाण आहे.
मुंबईत १ हजार ४७६ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत ९७ हजार ९५० बाधित असून असून ६८ हजार ५३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५ हजार ५२३ मृत्यू झाले असून २९० मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत.
देशात एका दिवसात नवे रूग्ण 32695
सर्वाधिक बाधित राज्ये, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी
दिल्ली -116993
गुजरात- 44552
महाराष्टÑ- 275640
कर्नाटक - 47253
तामिळनाडू - 151820