CoronaVirus News : दिलासा! कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले; दिवसभरात ७५३९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 09:09 PM2020-10-22T21:09:39+5:302020-10-22T21:15:33+5:30
CoronaVirus News : राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही रुग्ण बरे होण्याऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना व आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ७,५३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६,२५,१९७ झाली आहे. तर राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.
राज्यात १,५०,०११ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आज राज्यात १६,१७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण १४,३१,८५६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८. १ टक्क्यांवर पोहोचले आहे. याचबरोबर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,०२,५५९ कोरोना चाचण्यांचा अहवाल १६,२५,१९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात २४,५९,४३६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Maharashtra reports 7,539 new #COVID19 cases, 198 deaths and 16,177 discharges in the last 24 hours, as per the state's Public Health Department.
— ANI (@ANI) October 22, 2020
Total cases in the state rise to 16,25,197, including 42,831 deaths and 14,31,856 recovered patients. Active cases stand at 1,50,011. pic.twitter.com/gGv8sW4EEQ
राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे ७, नवी मुंबई २, उल्हासनगर महापालिका २, भिवंडी-निजामपूर मनपा २, मिरा-भाईंदर मनपा २, वसई-विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर १४, पुणे ११, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ११, सातारा १०, कोल्हापूर ६, सांगली ९, उस्मानाबाद ४, नागपूर २०, भंडारा ४ आणि अन्य १ यांचा समावेश आहे.