CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:41 AM2021-02-08T05:41:33+5:302021-02-08T07:28:08+5:30

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत.

CoronaVirus News: Corona growth rate in Maharashtra is slower than other states | CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी

CoronaVirus News: इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनावाढीचा वेग होतोय कमी

Next

मुंबई : कोविडचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने अतिशय गांभीर्याने आणि  पारदर्शकपणे पावले उचलल्याने दर १० लाख लोकांचा विचार केला, तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनावाढीचा वेग किंवा मृत्युदर कमी आहेत, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. 

महाराष्ट्राने वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविलेले नाहीत. २ फेब्रुवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार दर दशलक्ष लोकसंख्येत दिल्लीत ३७ हजार ८४४, गोव्यात ३६ हजार ७३२, पाँडिचेरीत ३१ हजार ३५०, केरळमध्ये २८ हजार ८९, चंडीगढमध्ये १९ हजार ८७७ इतके पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यामानाने महाराष्ट्रात यादिवशी १६ हजार आठ रुग्ण होते. महाराष्ट्राचा  क्रमांक यामध्ये देशात सहावा होता.  सक्रिय रुग्णांबाबत महाराष्ट्रात दर १० लक्ष लोकसंख्येत २९० रुग्ण असताना केरळमध्ये २००० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आज आहेत. एकूण मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली, तरी दर १० लाख लोकसंख्येत मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आकडेवारीनुसार  दिल्लीत ६४७, गोव्यामध्ये ५२७, पाँडिचेरीत ५२२ आणि महाराष्ट्रात ४०३ मृत्यू झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे दर १० लक्ष लोकसंख्येचा विचार केला, तर सर्वाधिक मृत्यू असलेले राज्य म्हणता येणार नाही. 

राज्यात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट 
राज्यात १,६२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आतापर्यंत एकूण १९,५५,५४८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६७% एवढे झाले आहे. 
राज्यात दिवसागणिक उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसतेय; सध्या ३५ हजार ९४८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी २,६७३  नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ५७२ दिवसांवर 
मुंबईत रविवारी ७११ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९४ हजार १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona growth rate in Maharashtra is slower than other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.