CoronaVirus News : अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 03:49 AM2020-06-21T03:49:50+5:302020-06-21T03:50:00+5:30
CoronaVirus News : सरकारी-खासगी रुग्णालय कर्मचा-यांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, पत्रकार यांना लोकल सेवेतून दूरच ठेवले आहे.
मुंबई : राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल धावत आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत मोडणाºया अन्य कर्मचाºयांना लोकल सेवेचा लाभ घेता येणार नाही.
बेस्ट, एसटी यांसारख्या परिवहन सेवेत मोडणाºया कर्मचाºयांना, विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, पालिका शिक्षक, सरकारी-खासगी रुग्णालय कर्मचाºयांसह पॅथॉलॉजी केंद्रातील कर्मचारी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, पत्रकार यांना लोकल सेवेतून दूरच ठेवले आहे.
अंतर्गत ताळमेळ नाही
पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जे. व्ही. एल. सत्यकुमार म्हणाले, पश्चिम रेल्वे मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील लोकलमध्ये बेस्ट, एसटी या परिवहन क्षेत्रातील कर्मचाºयांनाही प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले, सरकारने १५ जूनपासून ज्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. त्यांनाच प्रवास करण्यास मुभा असेल.
दोघांनी दिलेल्या या परस्पर प्रतिक्रियांमुळे पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांमध्ये ताळमेळा नसल्याचे चित्र आहे.
>अद्याप बदल नाही
१५ जूनपासून सुरू झालेली उपनगरी रेल्वे राज्य सरकारने निश्चित
केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठीच आहे. यात अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.