CoronaVirus News in Maharashtra : राज्यात सोमवारी ५२ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त; दिवसभरात २५८ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 01:11 AM2021-04-13T01:11:12+5:302021-04-13T01:11:36+5:30
CoronaVirus News in Maharashtra : आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ असून, मृतांचा आकडा ५८ हजार २४५ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई : मुंबईप्रमाणे राज्यातही काहीसा वीकेंड लाॅकडाऊनचा परिणाम दिसून आला आहे. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळाला आहे. याखेरीज, ३००च्या घरात असणारे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण २५८वर आले आहे. दिवसभरात ५१ हजार ७५१ रुग्णांचे निदान झाले आहे, तर मागील २४ तासांत ५२ हजार ३१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६ असून, मृतांचा आकडा ५८ हजार २४५ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सोमवारी नोंद झालेल्या २५८ मृत्यूंमध्ये मुंबई ४३, ठाणे २, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा ४, मीरा भाईंदर मनपा २, पालघर १, वसई विरार मनपा ३, पनवेल मनपा ७, नाशिक ८, नाशिक मनपा १३, मालेगाव मनपा ३, अहमदनगर ७, अहमदनगर मनपा ८, धुळे १, धुळे मनपा ३, जळगाव ८, जळगाव मनपा ४, पुणे ३, पुणे मनपा २, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा १०, कोल्हापूर १, सांगली ६, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ३ परभणी ३, परभणी मनपा १२, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद ६, बीड ६, नांदेड ११, नांदेड मनपा ६, अकोला १, अकोला मनपा ६, , बुलढाणा २, नागपूर २, नागपूर मनपा ११, गोंदिया ८ , चंद्रपूर ९, चंद्रपूर मनपा ३ इ. समावेश आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९४ टक्के
राज्यात एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९४ टक्के झाले असून, मृत्युदर १.६८ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या दोन कोटी २३ लाख २२ हजार ३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.४९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३२ लाख ७५ हजार २२४ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर २९ हजार ३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.