CoronaVirus News in Maharashtra : राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात 59 हजार 907 नवे रुग्ण, 322 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 10:39 PM2021-04-07T22:39:18+5:302021-04-07T22:57:56+5:30
CoronaVirus News in Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या 82.36 टक्के एवढे आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात दिवसभरात 60 हजाराच्या घरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजार 296 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजची कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 59,907 new COVID cases, 30,296 recoveries, and 322 deaths in the last 24 hours )
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात गेल्या 24 तासांत 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच, सध्या 5 लाख 1 हजार 559 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नव्या आकडेवारीसह राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 31 लाख 73 हजार 261 झाली आहे. त्यातील 26 लाख 13 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 56 हजार 652 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या 82.36 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 11लाख 48 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 31 लाख 73 हजार 261 (15.00 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख ७८ हजार 530 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तर 21 हजार 212 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra reports 59,907 new COVID cases, 30,296 recoveries, and 322 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 7, 2021
Total cases: 31,73,261
Active cases: 5,01,559
Total recoveries: 26,13,627
Death toll: 56,652 pic.twitter.com/eWsr5P17CT
मुंबईतील आकडेवारी चिंताजनक!
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजची आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपला आहे. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोरोनाचा वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 7, 2021
7-Apr; 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 10,428
Discharged Pts. (24 hrs) - 6,007
Total Recovered Pts. - 3,88,011
Overall Recovery Rate - 80%
Total Active Pts. - 81,886
Doubling Rate - 35 Days
Growth Rate (31 Mar-6 Apr) - 1.91%#NaToCorona