CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ६३ हजारांहून अधिक रुग्ण, तर  ३४९ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:29 AM2021-04-12T01:29:37+5:302021-04-12T07:22:35+5:30

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

CoronaVirus News in Maharashtra: More than 63,000 patients die in 24 hours in state | CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ६३ हजारांहून अधिक रुग्ण, तर  ३४९ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus News in Maharashtra : राज्यात २४ तासांत ६३ हजारांहून अधिक रुग्ण, तर  ३४९ रुग्णांचा मृत्यू

Next

मुंबई : राज्यात २४ तासांत ६३ हजार २९४ रुग्णांची नोंद झाली असून ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्ण व मृत्यूंत झालेली ही विक्रमी नोंद आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ झाली असून मृतांचा आकडा ५७ हजार ९८७ झाला आहे.
 राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्के असून मृत्यूदर १.७ टक्के आहे. राज्यात रविवारी ३४ हजार ८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून  सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २५ हजार ६९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ३४९ मृत्यूंमध्ये मुंबई ७९, ठाणे १, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ५, उल्हासनगर मनपा १, भिंवडी निजामपूर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ४, रायगड १, पनवेल मनपा ५, नाशिक १७, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा ५, जळगाव ५, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ६, पुणे मनपा ७, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ३, सोलापूर मनपा १, सातारा ८, कोल्हापूर मनपा २, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा १६, सिंधुदुर्ग ४, औरंगाबाद १६, औरंगाबाद मनपा २०, जालना ५, हिंगोली ३, परभणी ८, परभणी मनपा ४, लातूर ३, लातूर मनपा १, उस्मानाबाद ७, बीड ११, नांदेड ८, नांदेड मनपा ३, अकोला २, अमरावती १, अमरावती मनपा १, यवतमाळ २, बुलढाणा ४, वाशिम २, नागपूर ७, नागपूर २७, वर्धा २, भंडारा १, गोंदिया ९, चंद्रपूर ११, चंद्रपूर मनपा २, आणि अन्य राज्य/देशातील २ रुग्णांचा समावेश आहे.

११ ते १२ जिल्ह्यांत खाटा उपलब्ध नाही
४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे. शनिवारी २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात खाटा उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
 

Web Title: CoronaVirus News in Maharashtra: More than 63,000 patients die in 24 hours in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.