CoronaVirus News : महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे!, राहुल गांधींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 01:52 AM2020-05-17T01:52:13+5:302020-05-17T01:52:54+5:30

केंद्र सरकारकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

CoronaVirus News: Maharashtra must get help !, Congress supports Rahul Gandhi's demand | CoronaVirus News : महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे!, राहुल गांधींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा

CoronaVirus News : महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे!, राहुल गांधींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा

Next

मुंबई : महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
थोरात म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे केंद्र आहे. पण केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्ये जी अडचणीत आली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. एकेठिकाणी भाजप नेतृत्व महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जात आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे नेते प्रत्येक राज्याचे महत्त्व जाणतात. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान किती मोठे योगदान आहे, याची जाणिव काँग्रेस नेतृत्त्वाला आहे.
गेल्या सत्तर वर्षात देशाचे नेतृत्व केलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहिले पण दुर्देवाने सध्याच्या भाजप नेतृत्वाकडून गेल्या सहा वर्षात न्याय भूमिका घेतली गेली नाही, असा खेदही थोरात यांनी व्यक्त केला.

पॅकेज नेमके कोणासाठी? - अशोक चव्हाण
केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Web Title: CoronaVirus News: Maharashtra must get help !, Congress supports Rahul Gandhi's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.