CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला १६ लाखांचा टप्पा; नवीन रुग्णसंख्येत कमालीची घट!
By Ravalnath.patil | Published: October 19, 2020 10:26 PM2020-10-19T22:26:59+5:302020-10-19T22:29:59+5:30
CoronaVirus News : आज राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज १२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नवीन रुग्णसंख्येत विक्रमी घट झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ९८४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख १ हजार ३६५वर पोहोचली आहे. यापैकी ४२ हजार २४० जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. आज राज्यातील १५ हजार ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४८ टक्के इतके आहे. तर सध्या राज्यात एकूण १ लाख ७३ हजार ७५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ (१९.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
#Maharashtra reports 5,984 new #COVID19 cases, 15,069 discharged cases & 125 deaths today, as per State Health Department.
— ANI (@ANI) October 19, 2020
Total cases: 16,01,365
Discharged cases: 13,84,879
Active cases: 1,73,759
Deaths: 42,240 pic.twitter.com/QTNe3NIEj8
दरम्यान, मुंबईनंतर कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ४० हजारच्या खाली आला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ३८ हजार ३३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर मुंबईत १९ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २८ हजार ७२४ इतका आहे.
मुंबईत १,२३३ नवे रुग्ण, ४५ जणांचा मृत्यू!
गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार २३३ नवे रुग्ण आढळले असून ४५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ४३ हजार १७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण २ लाख १२ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, सध्या मुंबईत १८ हजार ६२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#Mumbai reports 1,233 new #COVID19 cases, 2,092 discharges and 45 deaths today, as per Municipal Corporation Greater Mumbai
— ANI (@ANI) October 19, 2020
Total cases: 2,43,172
Discharged cases: 2,12,905
Active cases: 18,624
Deaths: 9,776 pic.twitter.com/wq7OTOAVT0