CoronaVirus News : चिंताजनक! राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 09:09 PM2020-11-25T21:09:45+5:302020-11-25T21:11:28+5:30
CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. आज राज्यात ६ हजार १५९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ४ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ६३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२. ६४ टक्के इतके झाले आहे. तर आज राज्यात एकूण ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६० टक्के इतका आहे.
Maharashtra reports 6,159 new COVID-19 cases, 4,844 recoveries, and 65 deaths, says State Health Departement
— ANI (@ANI) November 25, 2020
Total cases: 17,95,959
Total recoveries: 16,63,723
Active cases: 84,464
Death toll: 46,748 pic.twitter.com/BJtXpG6sox
सध्या राज्यात ५ लाख २९ हजार ३४४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ८४ हजार ४६४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४ लाख ५६ हजार ९६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ९५ हजार ९५९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.