CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 08:38 PM2020-05-02T20:38:20+5:302020-05-02T20:38:49+5:30

दिलासादायक बाब म्हणजे आज धारावी या मोठ्या झोपडपट्टीमध्ये ३८ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यभरात एकूण १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

CoronaVirus news in Marathi patient in the state increases; Today 36 people died hrb | CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू

CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई : देशात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविला आहे. मात्र, याचबरोबर देशभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक लागण झाली असून आज एकूण ७९० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ हजार  २९६ वर पोहोचला आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे आज धारावी या मोठ्या झोपडपट्टीमध्ये ३८ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यभरात एकूण १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. देशासोबतच राज्यातही लॉकडाऊन १७ मे पर्यंत राहणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह महत्वाचे जिल्हे रेड झोन घोषित करण्यात आले आहेत.


राज्यात एकूण २००० जण कोरोनामुक्त झाले असून ही आकडेवारीही दिलासा देणारी आहे. आज राज्यात कोरोनाममुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईत २७, पुण्यामध्ये ३, अमरावती २, वसई विरार १, अमरावती १ आणि औरंगाबाद मनपा हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या एका नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. 


राज्यभरात एकूण १,७४,९३३  लोक होमक्वारंटाईन असून १२,६२३ जण संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...

CoronaVirus ठाणे जिल्ह्यात कहर! आज 97 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 1109

जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

Web Title: CoronaVirus news in Marathi patient in the state increases; Today 36 people died hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.