CoronaVirus News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन; मांडल्या 'या' सूचना...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:10 PM2020-06-10T15:10:03+5:302020-06-10T15:18:08+5:30
CoronaVirus News : मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील निवेदन आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे.
मुंबई : कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात काही सूचना मांडल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील निवेदन आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेळोवेळी पक्षाच्यावतीने जनहितार्थ अनेक गोष्टी सुचवित आहोत व त्यातील अनेक सूचना आपण प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुमचे आभार. आज ही या निवेदनात काही सूचना तुमच्यासमोर मांडत आहोत, त्याचा आपण अंमलबजावणीसाठी विचार करू शकता, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
मा राजेश टोपेजी , आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) June 10, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वेळोवेळी पक्षाच्या वतीने जनहितार्थ अनेक गोष्टी सुचवित आहोत व त्यातील अनेक सूचना आपण प्रत्यक्षात आणल्याबद्दल तुमचे आभार. आज ही या निवेदनात काही सूचना तुमच्यासमोर मांडत आहोत, ज्याचा आपण अंमलबजावणी
राज्यभर कोरोनाच्या टेस्ट या सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याद्वारे करून घेतल्या जात आहेत, परंतु अनेकदा ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत, असे नागरिक सुद्धा स्वतःहून त्यांच्या व त्यांच्या निकटवर्तीयांच्या सुरक्षेसाठी अशा टेस्ट करू इच्छितात. मात्र, त्या स्थानिक संस्थेच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करता येत नाही. कारण कोरोनाविषयी सर्व माहिती एकत्रितपणे संकलित करण्यासाठी बहुदा हा नियम असावा. परंतु हा नियम शिथिल करावा व ज्यांना लक्षणे नाहीत. मात्र, टेस्ट करायची आहे अशांना आधार कार्ड व इतर माहितीच्या आधारे ही परवानगी द्यावी, अशी सूचना बाळा नांदगावकर यांनी मांडली आहे.
याचबरोबर, टेस्टिंग लॅब ही टेस्ट करून आवश्यक माहिती सरकारकडे ऑनलाइन पुरवेल, यामुळे टेस्टसाठी प्रिस्क्रिप्शन घेण्याची अडचण कमी होईल व टेस्टची संख्या ही वाढेल व सरकारकडे टेस्ट केलेल्यांची सर्व माहिती देखील जमा होईल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. तसेच, काही केसेसमध्ये प्लाझ्मा थेरपी ही उपयोगी पडत आहे, परंतु प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा दाते सापडणे थोडे कठीण आहे. आत्ता लगेच प्लाझ्मा बँक बनविणे ही अवघड आहे. परंतु कोरोनामुक्त झालेले पेशंट जर त्यांच्या संमतीने प्लाझ्मा देण्यास तयार असतील तर त्यांची माहिती संकलित करून ठेवावी, जेणेकरून गरजूंना अशा दात्यांना शोधणे सोपे जाईल, असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या...
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षिकेचा 'देसी जुगाड'; पाहून तुम्हीही कराल तोंडभरून कौतुक!
मंत्रिमंडळातील खडाजंगीवरून आशिष शेलारांचा 'ठाकरे' सरकारला चिमटा
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोनाने घेतला आमदाराचा बळी, वाढदिवसाच्या दिवशीच झाला मृत्यू
CoronaVirus in Thane नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन
चिनी सैन्याची माघार, पण जिनपिंग यांचा स्टार कमांडर सीमेवर तैनात
Jammu and Kashmir : सुरक्षा दलांना मोठं यश, शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा