CoronaVirus News : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाखांहून अधिक, दिवसभरात ४७४ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:17 AM2020-09-17T02:17:31+5:302020-09-17T02:17:50+5:30
राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे.
मुंबई : देशभरात नवीन कोरोना रुग्ण आढळणाऱ्यांत राज्य पहिल्या स्थानावर आहे. राज्यात बुधवारी २३,३६५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४७४ मृत्यू झाले. परिणामी, एकूण ११ लाख २१ हजार २२१ बाधित असून, मृतांची संख्या ३०,८८३ वर पोहोचली आहे.
सध्या राज्यात २ लाख ९७ हजार १२५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.७१ टक्क्यांवर पोहोचले असून, मृत्युदर २.७५ टक्के आहे.
राज्यातील ४७४ मृत्यूंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा २, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर १, वसई-विरार मनपा ८, रायगड २७ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १५,५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण कोविडमुक्त झाले.
राज्यात सर्वाधिक ८२ हजार १७२ एवढे सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल मुंबईत ३१ हजार ७६६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ५५ दिवस
मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ७७% असून रुग्णदुपटीचा काळ ५५ दिवस आहे. दिवसभरात २,३७८ रुग्ण आढळले असून ५० मृत्यू झाले. सध्या एकूण १ लाख ७५ हजार ९७४ कोरोना रुग्ण असून मृतांची संख्या ८,२८० आहे. आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५६३ जण बरे झाले असून, ३१,७६६ सक्रिय रुग्ण आहेत.