CoronaVirus News: वाढता वाढता वाढे धोका! महाराष्ट्रासमोर नवं संकट; 'त्या' आकड्यामुळे चिंतेत भर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:10 AM2021-05-27T11:10:46+5:302021-05-27T11:22:45+5:30
CoronaVirus News: राज्यासमोरील अडचणींमध्ये वाढ; मे महिन्यातील आकडा वाढवतोय चिंता
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. एप्रिलच्या मध्यावर कोरोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला होता. आता तोच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या घटली आहे. मात्र आता एका नव्या संकटानं महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
मे महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. मात्र याच महिन्यात लहान मुलांना असलेला कोरोनाचा धोका वाढला. मे महिना संपायला अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. मात्र आतापर्यंत ३४ हजार ४८६ लहानग्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, १ ते २६ मे या कालावधीत १० वर्षांपर्यंतच्या ३४ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली.
कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘पोस्ट कोविड लक्षणं’ बनू शकतात धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा
१ मे रोजी राज्यातील कोरोना बाधित मुलांची संख्या १ लाख ३८ हजार ५७६ होती. २६ मे रोजी हा आकडा १ लाख ७३ हजार ६० वर पोहोचला. १ मे रोजी ११ ते २० वर्षे वयोगटातील कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ११ हजार ४५५ होती. २६ मे रोजी हाच आकडा ३ लाख ९८ हजार २६६ वर जाऊन पोहोचला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या संदर्भात कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.