CoronaVirus News : दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:37 AM2020-09-16T04:37:30+5:302020-09-16T04:38:16+5:30
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ टक्के झाले असून मृत्युदर २.७७ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ९१ हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात मंगळवारी तब्बल ५१५ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला, तर आतापर्यंत ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २० हजार ४८२ रुग्ण आढळले असून परिणामी कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ९७ हजार ८५६ झाली आहे.

राज्यातील ५१५ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर ११६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. एकूण ५१५ मृत्यूंमध्ये मुंबई ४९, ठाणे ७, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १३, कल्याण-डोंबिवली मनपा २६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा २, पालघर ५, वसई- विरार मनपा ५, रायगड १०, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १९,४२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७ लाख ७५ हजार २७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर
मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुपटीचा काळ ५४ दिवसांवर पोहोचला आहे. दिवसभरात १ हजार ५८६ रुग्ण आढळले असून ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहरात सध्या १ लाख ७३ हजार ५९६ कोरोनाबाधित असून ८ हजार २३० मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३० हजार ९३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात कोरोनाचे ५०० हून अधिक मृत्यू; २० हजार ४८२ नवीन बाधित