CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:00 AM2020-09-15T03:00:16+5:302020-09-15T03:01:03+5:30

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत.

CoronaVirus News: Only teachers on duty in CoronaVirus News | CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

googlenewsNext

मुंबई : राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असून या पार्श्वभूमीवर सध्यस्थितीत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंदच ठेवून घरून आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आॅनलाइन शिक्षण प्रक्रियेतील विद्यार्थ्यांइतकाच महत्त्वाचा घटक असणारे शिक्षक आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सेवा अनलॉक होताना आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळेत बोलवा, याचा चुकीचा अर्थ काढून शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक केल्याने राज्यात व मुंबईत अनेक ठिकाणी शिक्षकांना संसर्ग होऊन ते मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
अशा परिस्थितीत आॅनलाइन शिक्षण सुरू असताना विनाकारण शाळांमध्ये सर्व शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक न करता आवश्यक त्या सूचना शिक्षण विभागाने निर्गमित कराव्यात, अशी मागणी शिक्षकांमधून जोर धरू लागली आहे.
नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार ५०% शिक्षकांना - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलविता येणार आहे. या सूचनांवर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अद्याप तरी काही सूचना नसल्या तरी याआधी त्या देण्यात आल्या आहेत.
मात्र या परिस्थितीत प्रवासाची सुविधा नसताना कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, विरार, वसईसारख्या ठिकाणांहून येणाºया शिक्षकांमध्ये संक्रमण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
मागील काही आठवड्यांत मनपा खाजगी शाळांतील ६ ते ८ शिक्षकांना संसर्ग झाला असून, त्यातील काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

महिला शिक्षकांचे हाल; संसर्गाचा धोका
यामध्ये महिला शिक्षकांचे हाल होत असून प्रवासादरम्यानही संसर्गाचा धोका असल्याने त्यांना जास्त भीती वाटत आहे. शाळा सुरू होईपर्यंत आॅनलाइन शिक्षण सुरू असताना आणि संसर्गाचा धोका वाढत असताना शिक्षकांवर उपस्थितीची जबरदस्ती का, असा सवाल शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला. दरम्यान, अनेक ठिकाणी विनाकारण शाळेत बोलविण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असल्याने शाळा सुरू होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतरांना शाळेत बोलावू नका, अशी मागणी मुंबई प्रदेश भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबईच्या शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षकांकडे केली आहे.

कोरोनाचा संसर्ग पाहता सद्य:स्थितीत शाळा सुरू करण्याच्या कोणत्याही सूचना शिक्षण विभागाकडून नाहीत. मात्र आवश्यकता असल्यासच शिक्षकांना शाळेत बोलावण्याच्या सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणेच शाळांनी कार्यवाही करावी. 
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, शालेय शिक्षण विभाग

Web Title: CoronaVirus News: Only teachers on duty in CoronaVirus News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.