CoronaVirus News : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 12:48 AM2020-11-01T00:48:32+5:302020-11-01T06:11:08+5:30
CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ४३ हजार ९११ वर पोहोचला आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सात महिन्यांचा काळ लोटला आहे. मोठ्या कालावधीनंतर शनिवारी कोरोनामुक्तीचा दर तब्बल ९० टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार ३०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत १५ लाख १० हजार ३५३ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या १ लाख २३ हजार ५८५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ४३ हजार ९११ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात २५ लाख ३७ हजार ५९१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, १२ हजार ३४२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
राज्याचा मृत्युदर सध्या २.६२ टक्के असून नोंद झालेल्या ७४ मृत्यूंमध्ये मुंबई ३२, ठाणे ३, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा २, वसई विरार मनपा १, पनवेल मनपा १, नाशिक १, जळगाव २, पुणे १, पुणे मनपा ६, सोलापूर ३, सांगली ३, जालना २, परभणी १, बीड १, नांदेड १, नांदेड मनपा २, चंद्रपूर २, अकोला १, अकोला मनपा १, यवतमाळ २, बुलडाणा १, नागपूर १, नागपूर मनपा ३ या रुग्णांचा समावेश आहे.