CoronaVirus वाहतूक शाखेविरोधात बातम्या दिल्या; पोलिसांकडून पत्रकारास अमानुष मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 08:13 PM2020-03-29T20:13:37+5:302020-03-29T21:05:03+5:30
सकाळी १0 ते १ या कालावधीत किराणा व भाजीपाला खरेदीची मुभा देण्यात आली आहे. मात्र या दरम्यानही वाहतूक शाखेकडून नागरिकांना मारहाण करून हाकलून देत आहेत.
हिंगोली : वाहतूक शाखेच्या विरोधात अनेकदा वृत्त प्रसारित केल्याचा राग काढत वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षकांसह कर्मचाºयांनी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीला अमानुषपणे मारहाण केल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. तर यात पत्रकारानेही काही जणांना आणून मारहाण केली असून डोके फोडल्याचे सांगत पोलीस अधिकारीही रुग्णालयात दाखल झाला आहे.
सकाळी १0 ते १ या कालावधीत किराणा व भाजीपाला खरेदीची मुभा देण्यात आली आहे. मात्र या दरम्यानही वाहतूक शाखेकडून नागरिकांना मारहाण करून हाकलून लावले जात असल्याने त्याचे वार्तांकन करीत असताना पोलिसांनी आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकावला. तो परत मागत असताना कोणतीही चौकशी न करता खंडेलवाल यांना बेदम मारहाण केली. यावरून शाब्दीक वाद झाल्यानंतर यापूर्वीही या चॅनलवर विरोधात बातम्या आल्याने खंडेलवाल यांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात नेले. तेथेही कानपट्टीवर पिस्तूल लावत पोलिसांनी सामूहिकपणे बेदम मारहाण केली. खंडेलवाल बेशुद्ध झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, असे कन्हैय्या खंडेलवाल यांनी सांगितले. तर यादरम्यान वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकरही डोके फुटल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनीही कन्हैय्या खंडेलवाल यांच्या गल्लीतील युवकांना का अडविले म्हणून खंडेलवाल यांनी अरेरावी केली. त्यानंतर चार ते पाच जणांना बोलावून मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात माझे डोकेही फुटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग टाकले आहे.
या सर्व प्रकारात खुन्नस म्हणून पत्रकारास मारहाण करणाºया चिंचोलकर यांच्यासह वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदने पाठवण्यात आली.