CoronaVirus News : कांदिवलीतील दामूनगरमध्ये चोरांची मध्यरात्री दरवाजावर ठकठक, स्थानिक दहशतीत अन् पोलिसांचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:41 AM2020-06-25T01:41:30+5:302020-06-25T01:42:09+5:30

नकांमध्ये दहशत पसरली असून समतानगर पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे.

CoronaVirus News : Thieves knock on the door in Damunagar, local terror and neglect of police | CoronaVirus News : कांदिवलीतील दामूनगरमध्ये चोरांची मध्यरात्री दरवाजावर ठकठक, स्थानिक दहशतीत अन् पोलिसांचे दुर्लक्ष

CoronaVirus News : कांदिवलीतील दामूनगरमध्ये चोरांची मध्यरात्री दरवाजावर ठकठक, स्थानिक दहशतीत अन् पोलिसांचे दुर्लक्ष

Next

मुंबई : कांदिवली पूर्वच्या दामूनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या शेजाऱ्याला ‘क्वारंटाइन’ केले गेले आहे. या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. दहशत पसरविण्यासाठी दरवाजावर ‘ठक, ठक’ असा आवाज करण्यात येत आहे. स्थानकांमध्ये दहशत पसरली असून समतानगर पोलिसांकडून या ठिकाणी गस्त घालण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे.
कांदिवली पूर्वच्या दामूनगर परिसरात गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचे घर फोडून त्यातील चार ते पाच तोळे सोने चोरीला गेले. गावडे कम्पाऊंडच्या सरस्वती शाळेसमोरील शौचालयालगत असलेल्या चाळीत दररोज रात्री दीड ते चार वाजेपर्यंत चोरांचा वावर सुरू असल्याने चाळीतील रहिवासी सध्या दहशतीखाली आहेत. रात्रभर जागरण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी या ठिकाणी चोर स्थानिकांच्या दरवाजावर ‘ठकठक’ असा आवाज करतात. काही कालावधीच्या अंतराने दरवाजा ठोठावला जातो. मात्र जीवाच्या भीतीने कोणीच स्थानीक घराबाहेर येण्याची हिम्मत करत नाही. याबाबत समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांना विचारले असता असे काही प्रकार घडत नसून ही निव्वळ अफवा आहे. आमचे पथक वेळोवेळी सर्व परिसरात गस्त घालत असते, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचे स्थानिक राजकारण्यांकडून समजत असून त्यांच्या सुरक्षेसाठी ंउपाययोजना करण्यात याव्यात, ही मागणी करण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus News : Thieves knock on the door in Damunagar, local terror and neglect of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.