CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 02:54 PM2021-04-01T14:54:36+5:302021-04-01T14:54:56+5:30
CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षात कोरोना संकटाची तीव्रता सर्वाधिक असताना जितक्या रुग्णांची संख्या नोंद झाली, त्याहीपेक्षा अधिक रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
संपूर्ण देशाचं लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, असा सल्ला साळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण व्हायला हवं. गंभीर आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्यानं लस द्यायला हवी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला.
अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावा
देशाची लोकसंख्या १३५ कोटी, महाराष्ट्राची १२ कोटी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचं आव्हान असं म्हटलं गेलं. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला हवी, अशी गरज साळुंखेंनी व्यक्त केली. पुण्यात दररोज १ लाख लोकांचं लसीकरण व्हायला हवं. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज १ लाख लसीकरण व्हायला हवं, असं ते पुढे म्हणाले.
आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोस
गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांनादेखील गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले.
आज कोरोनाची लस घेतली की उद्यापासून आपला कोरोनाचा बचाव होणार असं नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी वेळ जावा लागतो. या गोष्टीचा विचार लसीकरण करताना करण्यात यावा, असं साळुंखे यांनी सांगितलं. सध्या मुंबई, पुण्यात दररोज कोरोनाच्या ६ हजार केसेस आढळत आहे. पण हे हिमनगाचं टोक आहे. आज आढळून आलेले ६ हजार जण गेल्या काही दिवसांत किमान १० लोकांच्या संपर्कात आले, असा आकडा धरला तरी मग संख्या ६० हजारांच्या घरात जाईल. आताची कोरोना लस जाण्यासाठी एप्रिलचा शेवट उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.