CoronaVirus: “ठाकरे सरकराचं ‘मुंबई मॉडेल’ फसवं, हा निव्वळ खोटारडेपणा”; नितेश राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 01:10 PM2021-05-11T13:10:31+5:302021-05-11T13:12:12+5:30
CoronaVirus: सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील नीती आयोगाकडूनही ‘मुंबई मॉडेल’ ची दखल घेत कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे.
मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या घटताना पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील नीती आयोगाकडूनही ‘मुंबई मॉडेल’ ची दखल घेत कौतुक करण्यात आले. मात्र यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. (coronavirus nitesh rane slams thackeray govt over mumbai model of corona management)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतील परिस्थिती बिकट झाली होती. मात्र, महापालिकेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसंदर्भात समन्वय प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आला. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. मात्र, देशभरात नावाजले जात असलेले ठाकरे सरकराचे मुंबई मॉडेल हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील रुग्णांची नोंद पुणे, इतर शहरांत?
मुंबईतील कोरोना रुग्णांना पुणे आणि इतर शहरांमध्ये ट्रान्सफर करणे हेच ‘मुंबई मॉडेल’ आहे का? अनेक लोकांनी मला याबाबत सांगितले. मुंबईत एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली की, त्याला पुण्याच्या कोव्हिड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
गायीच्या शेणाने खरंच कोरोना बरा होतो?; डॉक्टरांनी दिलेला हा इशारा वाचाच!
Is the so called #MumbaiModel all about transferring patients to Pune n other cities ??
— nitesh rane (@NiteshNRane) May 11, 2021
Many tell me..Once some1 gets positive in Mumbai..he/she receives follow up calls from Pune covid war room..
That’s how the numbers r reduced for the sake of PR n a fake Mumbai Model?
“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही मोदी सरकार झोपा काढत राहिलं”
कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर
कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त दिसतो. फुल गोलमाल आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
“सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं?” रवीश कुमारांची PM मोदींवर टीका
दरम्यान, सोमवरी राज्यात ६१ हजार ६०७ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, ३७ हजार २३६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय ५४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४४,६९,४२५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७% एवढे झाले आहे.