शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 05:46 PM2020-06-12T17:46:49+5:302020-06-12T17:48:28+5:30

चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहता कामा नये. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारला धारेवर धरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

CoronaVirus: No debt on farmers' heads: Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचा फडणवीस यांचा इशारा

मंडणगड : चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहता कामा नये. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारला धारेवर धरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसलेल्या मंडणगड व दापोली तालुक्यांना त्यांनी शुक्रवारी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मंडणगड शहरातून वेळास बाणकोटकडे प्रयाण केले व तेथे जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

त्यांच्यासमवेत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, भाजपा तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे, माजी सभापती प्रिया दरिपकर स्मिता जावकर, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus: No debt on farmers' heads: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.