CoronaVirus: ‘दारूविक्री सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:41 AM2020-04-22T05:41:09+5:302020-04-22T06:49:54+5:30

विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नाही.

coronavirus no proposal to start liquor sale says excise duty department | CoronaVirus: ‘दारूविक्री सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही’

CoronaVirus: ‘दारूविक्री सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही’

Next

मुंबई : सोशल डिस्टन्सिंग पाळले तर राज्यात दारूची दुकाने सुरू होऊ शकतात, असे विधान सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असले तरी दारू दुकाने वा उत्पादन सुरू करण्याचा कुठलाही प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागासमोर तूर्त नाही.

विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू दुकाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन नाही. लॉकडाउनच्या काळात ही दुकाने उघडण्याची शक्यता त्यामुळे मावळली आहे. सूत्रांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत दारू दुकाने सुरू करण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. ही दुकाने सुरू केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शंका केंद्राला वाटते.

Web Title: coronavirus no proposal to start liquor sale says excise duty department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.