CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:14 AM2020-04-24T05:14:21+5:302020-04-24T07:05:54+5:30

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर

CoronaVirus number of Corona hotspots in Maharashtra has decreased | CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या घटली

CoronaVirus: महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या घटली

googlenewsNext

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना उपचारासाठी नविन तंत्रज्ञान आणले जात आहे. पीपीई कीटची गरज भासू नये यासाठी फोटो बूथ सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी एक छोटी रूम केली जाईल ज्यात केवळ एक व्यक्ती (डॉक्टर) उभी राहू शकेल. त्यामधून केवळ हात बाहेर निघू शकेल ज्याला ग्लोव्हज असतील त्याद्वारे रुग्णाची स्वॅब चाचणी करता येईल, यासाठी पीपीई किटची गरज नाही. मुंबईत असे १०० फोटोबूथ बसवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात दररोज सुमारे सात हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पूर्वी ३.१, त्यानंतर ५ आणि आता ७.१ दिवसांवर गेला आहे.

Web Title: CoronaVirus number of Corona hotspots in Maharashtra has decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.