Breaking महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा २०००० पार; दिवसभरात ४८ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 09:00 PM2020-05-09T21:00:13+5:302020-05-09T21:01:04+5:30
आज मुंबईत ७२२ नवे रुग्ण सापडले असून ६५२ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून २०३ जण बरे झाले आहेत.
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत असून मृत्यूचा आकडाही मुंबईतच जास्त आहे. राज्यात आज ११६५ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या २०००० पार गेली आहे.
आज मुंबईत ७२२ नवे रुग्ण सापडले असून ६५२ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला असून २०३ जण बरे झाले आहेत. दरम्यान, मुंबईत एकूण १४४०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर १२६८९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण २७९२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज राज्यात ११६५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,२२८ झाली आहे. तर ३३० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण ३८०० रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडाही वाढला असून तो ४८ झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९ , मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. . कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७७९ झाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus in Mumbai चिंताजनक! मुंबईत मृतांच्या आकड्यात वाढ; ७२२ नवे रुग्ण
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी आता मोदींना साकडे; 1 कोटी पत्रं पाठविणार
इराण सौदी अरेबियावर कोणत्याही क्षणी हल्ला करू शकणार; तेलावरून वाजल्याने अमेरिकेने सुरक्षा काढली
महाराष्ट्र एसटीने मजुरांना सोडेल, पण मोदींनी मध्यस्थी करावी; शरद पवारांचे आवाहन
अमित शहा अत्यवस्थ? खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच गायब असण्याचे सांगितले कारण