coronavirus: "कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत’’, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:56 PM2021-04-08T12:56:46+5:302021-04-08T12:57:35+5:30

controversial statement by Sambhaji Bhide : वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे. मात्र असे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे.

coronavirus: "People who die due to corona are not fit to live", controversial statement by Sambhaji Bhide | coronavirus: "कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत’’, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान 

coronavirus: "कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत’’, संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान 

Next

सांगली - देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे. मात्र असे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे  ( Sambhaji Bhide)यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ("People who die due to corona are not fit to live", controversial statement by Sambhaji Bhide)

संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोरोनाबाबत हे विधान केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा फैलाव वाढल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुळात कोरोना हा रोगच नाही आहे. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे, असे विधान केले आहे. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

लहरी राजा, प्रजा आंधळी असा कोरोनाबाबत राज्यात आणि देशात कोरोनाबाबत कारभार सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, जो तो ती घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही संभाजी भिडे यांनी दिला. 

दरम्यान, कोरोनाच्या नव्या लाटेमुळे राज्यात आणि देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे 59 हजार ९०७ नवे रुग्ण सापडले होते. तर ३० हजार २९६ जणांनी कोरोनावर मात केली होती. तर संपूर्ण देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या ही सव्वा लाखाच्या पुढे पोहोचली आहे.  

Read in English

Web Title: coronavirus: "People who die due to corona are not fit to live", controversial statement by Sambhaji Bhide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.