CoronaVirus News: मोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 09:03 PM2020-05-31T21:03:14+5:302020-05-31T21:30:40+5:30

तसेच वृत्तपत्र वितरकांनी घरपोच पेपर पोहोचवणाऱ्या मुलांची काळजी घेणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

CoronaVirus: Permission to deliver the newspaper home; Important announcement of Uddhav Thackeray vrd | CoronaVirus News: मोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

CoronaVirus News: मोठी बातमी! वृत्तपत्र घरपोच पोहोचवण्यास परवानगी; उद्धव ठाकरेंची महत्त्वाची घोषणा

Next

मुंबईः रविवारपासून महाराष्ट्रात घरोघरी वृत्तपत्र सुरू करणार असून, घरपोच वृत्तपत्र पोहोचवण्याची परवानगी देतो आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. पण आवश्यक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच वृत्तपत्र वितरकांनी घरपोच पेपर पोहोचवणाऱ्या मुलांची काळजी घेणे अनिवार्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एकूण ६५ हजार रुग्ण, २८ हजाराच्या आसपास रुग्ण बरे झालेले आहेत. ३४ हजार रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत, २४ हजार रुग्णांना लक्षणेही नाहीत, साडेनऊ हजार मध्यम ते तीव्र लक्षणे आहेत, दोनशे रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे. बाहेर फिरताना सुरक्षित अंतर राखा, ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडू नये, सरकारला-जनतेला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचं असल्याचंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे. 

महाराष्ट्राला काही जण आपलीच मंडळी बदनाम करतात आहे. जवळपास 28 हजार रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तरीही काही जणांकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान पाहून दु:ख होते आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यांत नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनऐवजी आता मिशन बिगेन अगेन सुरू झालं आहे. एकीकडे लॉकडाऊन केलं असताना दुसरीकडे पूर्वपदावर येण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कालावधीत संपूर्ण राज्यात काही स्थळं व व्यवसायास बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुनश्च हरी ओम... केल्यानंतरही काळजी घेणं अनिवार्य असून तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. सध्या, पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

 

Web Title: CoronaVirus: Permission to deliver the newspaper home; Important announcement of Uddhav Thackeray vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.