Coronavirus: होम क्वॉरेंटाईनमधून बाहेर पडणं महागात पडणार; थेट पोलिसी कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 11:17 PM2020-03-21T23:17:12+5:302020-03-21T23:20:50+5:30

महसूल आणि पोलीस यंत्रणेला राज्य शासनाकडून आदेश

coronavirus police going to take action against those who do not follow home quarantine guidelines kkg | Coronavirus: होम क्वॉरेंटाईनमधून बाहेर पडणं महागात पडणार; थेट पोलिसी कारवाई होणार

Coronavirus: होम क्वॉरेंटाईनमधून बाहेर पडणं महागात पडणार; थेट पोलिसी कारवाई होणार

Next

मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वॉरेंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी  घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने शनिवारी महसूल आणि पोलिस यंत्रणेला  दिले. 

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत अशांना होम क्वॉरेंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
 
मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वॉरेंटाईनचे आदेश आहेत त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले.

Web Title: coronavirus police going to take action against those who do not follow home quarantine guidelines kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.