सकारात्मक : नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 10:31 PM2021-05-30T22:31:18+5:302021-05-30T22:32:39+5:30
Covid 19 : राज्यातील रुग्णसंख्या घटली; चोवीस तासांत २२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. असं असलं तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रूग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात १८,६०० नव्य़ा कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे २२,५३२ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.५५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे राज्यात ४०२ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात सध्या २,७१,८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत एकूण ५३,६२,३७० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Maharashtra reports 18,600 new #COVID19 cases, 402 deaths, and 22,532 discharges in the last 24 hours
— ANI (@ANI) May 30, 2021
Active cases 2,71,801
Case tally 57,31,815
Death toll 94,844
Total recovered cases 53,62,370 pic.twitter.com/F20orRGtoJ
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 30, 2021
30th May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1066
Discharged Pts. (24 hrs) - 1327
Total Recovered Pts. - 6,61,226
Overall Recovery Rate - 94%
Total Active Pts. - 27,322
Doubling Rate - 414 Days
Growth Rate (23 May - 29 May) - 0.16%#NaToCorona
मुंबईतही रुग्णसंख्या घटली
मुंबईतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत १,०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १,३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २७,३२२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण ६,६१,२२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ४१४ दिवसांवर गेला आहे.