CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 07:19 AM2020-04-06T07:19:28+5:302020-04-06T07:20:06+5:30

२१ लाख प्रवाशांना दिले एकूण १३४ कोटी : मुंबई विभागातून ६३ कोटींचा परतावा

CoronaVirus railway return ticket money to passengers hrb | CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

CoronaVirus कोरोनामुळे रेल्वे रद्द झाली; प्रवाशांना पैसे परत मिळू लागले

Next

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एक्स्प्रेस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी काढलेल्या तिकिटांचा परतावा पश्चिम रेल्वेकडून दिला जात आहे. १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण विभागातून एकूण २१ लाख २३ हजार प्रवाशांना १३४ कोटी ४८ लाख रुपयांचा तिकीट परतावा केला आहे. याच कालावधीत मुंबई विभागातून ९ लाख प्रवाशांना पश्चिम रेल्वेने ६३ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.


कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. लॉकडाउनमुळे भारतीय रेल्वे मार्गावर एकही प्रवासी वाहतूक सेवा सुरू नाही. प्रवाशांचा प्रवास रद्द होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांनी दोन-तीन महिन्यांअगोदर काढलेले तिकीट पश्चिम रेल्वेकडून रद्द केले जात आहे.


या प्रवाशांना तिकीट परतावा दिला जात आहे. १ मार्च ते ३१ मार्च कालावधीत २० लाख ९६ हजार प्रवाशांचा प्रवास रद्द झाला आहे.
परिणामी पश्चिम रेल्वेने या प्रवाशांना १३२ कोटी २५ लाख रुपयांचा तिकीट परतावा दिला आहे. तर मागील ४ दिवसात २२ हजार ४२७ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून २ कोटी २३ लाख रुपये परतावा देण्यात आला.


१ मार्च ते ४ एप्रिल कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण ९ लाख ३५ हजार ५०९ प्रवाशांनी तिकीट रद्द केले आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेने ६३ कोटी ४८ लाख रुपये परतावा केला आहे. १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत ९ लाख २३ हजार ६४५ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ६२ कोटी ४९ लाख रुपये परतावा देण्यात आला. तर मागील ४ दिवसात ११ हजार ८६४ प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. यातून ९८ लाख २४ हजार रुपये परतावा देण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: CoronaVirus railway return ticket money to passengers hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.