CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 09:36 PM2020-05-05T21:36:30+5:302020-05-05T21:38:05+5:30
दापोलीत २ तर संगमेश्वरात २ रुग्ण सापडले. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५ वर गेली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी चार कोरोनाचे रूग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोनाधित रूग्णांची संख्या १५ झाली आहे. मंगळवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील एकाच घरातील दोन महिला आणि दापोली तालुक्यातील वनौशी व शिरदे येथील युवकांचा समावेश आहे.
सोमवारी दापोली तालुक्यातील माटवण येथील रहिवासी असणारी परंतु मुंबई येथे उपचार घेणाऱ्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली होती. त्यात २८ एप्रिल रोजी दापोलीत मुंबई येथून चालत आलेल्या युवकांपैकी दोन युवकांचे मंगळवारी रात्री कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. हे युवक दापोली तालुक्यातील वनौशी व शिरदे गावातील आहेत. हे दोघेही मुंबईतून दापोलीत चालत आले होते.
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील सासू आणि सून यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या महिलाही मुंबईतून २९ एप्रिलला आल्या होत्या. त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांचेही अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात एकाच दिवसात चार रूग्ण आढळल्याची ही पहिलीच घटना आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी
चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त
CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल