CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के; आतापर्यंत १८ हजार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 06:16 AM2020-08-12T06:16:00+5:302020-08-12T07:23:53+5:30

कोरोनाचे १८ हजारांहून अधिक बळी

CoronaVirus recovery rate of corona patients in maharashtra near 69 per cent | CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के; आतापर्यंत १८ हजार जणांचा मृत्यू

CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के; आतापर्यंत १८ हजार जणांचा मृत्यू

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ८८ आणि २५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ३५ हजार ६०१ झाली असून बळींचा आकडा १८ हजार ३०६ झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात मंगळवारी ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ सक्रिय रुग्ण आहेत. १०, ०१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर ३.४२ टक्के एवढा आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या २५६ मृत्यूंपैकी मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ७, उल्हासनगर मनपा १६, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ३, पालघर ४, वसई-विरार मनपा ७, रायगड २, पनवेल मनपा २, नाशिक ४, नाशिक मनपा ९, मालेगाव मनपा २, अहमदनगर ५, धुळे १, धुळे मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, पुणे १२, पुणे मनपा ३६, कोल्हापूर २१, कोल्हापूर मनपा ६, नागपूर २, नागपूर मनपा १० आदी रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत १८,८८७ सक्रिय रुग्ण
मुंबईत दिवसभरात ९१७ रुग्ण व ४८ मृत्यू झाले. ाबाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार २२४ झाली आहे. तर ६,८९३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १८,८८७ सक्रिय रुग्ण आहेत. ९९,१४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९% आहे.

Web Title: CoronaVirus recovery rate of corona patients in maharashtra near 69 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.