CoronaVirus: ग्रीन, ऑरेंज झोनमधील नागरिकांना आजपासून दिलासा; जाणून घ्या काय बंद, काय सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 07:08 AM2020-04-20T07:08:02+5:302020-04-20T07:08:20+5:30
रेड झोन कठोर निर्बंध लागू राहणार
मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनचे पालन करीत सोमवारपासून राज्यासह संपूर्ण देशभर काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे. केवळ आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये काही अटींसह या सवलत मिळतील. रेड झोन व बाधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊनची बंधने लागू असतील. दिल्ली राज्य सरकारने मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हे निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला आहे.
कोरोनाच्या चिखलात अडकलेले अर्थचक्र पुन्हा सुरू करीत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले. राज्याप्रमाणे देशभरातही सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली जाणार आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होण्यात मदत होईल.
आजपासून या सेवा सुरू
शेती : शेतीविषयक कामे, शेती व बागायती कामांसाठी साहित्याची विक्री व उत्पादन, कृषिमाल खरेदी केंद्रे,
मत्स्य व्यवसाय, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे संकलन, प्रक्रिया, वितरण, विक्री, पोल्ट्री फार्म, हॅचरीज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प
बँकिंग आणि पतपुरवठा
बँक शाखा आणि एटीएम, कॅश मॅनेजमेंट एजन्सिज, इन्शुरन्स कंपनी, सहकारी पतसंस्था.
मनरेगा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मजुरांना ही कामे करता येतील.
जीवनावश्यक वस्तूंची विक्री, वाहतूक आणि साठवणूक. दुकाने उघडण्याची किंवा बंद करण्याच्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.
गॅरेज व धाबे
ट्रक दुरुस्तीची दुकाने, महामार्गावरील धाबे सुरू करण्यास परवानगी
इंधन विक्री आणि वाहतूक
पेट्रोल, डिझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी, पीएनजी या इंधन व गॅसची वाहतूक, वितरण, साठवणूक व विक्री
पोस्टल, कुरिअर सेवा, दुरध्वनी, इंटरनेट सेवा
ब्रॉडकास्टिंग, डीटूएच आणि केबल सेवा
५० टक्के कर्मचारी संख्येसह आयटी व आयटीसंबंधित सेवा
कमीत-कमी मनुष्यबळासह डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्स
हे सर्व मात्र बंदच राहील
मेट्रो व लोकलसह रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक
रस्ता मार्गाने होणारी खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहतूक
टॅक्सी, रिक्षा व ओला-उबरसारख्या अॅपआधारित प्रवासी सेवा
सर्व शाळा, कॉलेजे, विद्यापीठे, अन्य प्रशिक्षण संस्था व कोचिंग क्लास
सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे
वैद्यकीय कारणांखेरीज लोकांचे आंतरजिल्हा व आंतरराज्य येणे-जाणे
देशांतर्गत सर्व विमान वाहतूक
सामाजिक, राजकीय, क्रीडाविषयक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक यासह
गर्दी होईल असा अन्य कोणताही कार्यक्रम
विशेष परवानगी दिलेल्यांखेरीज अन्य व्यावसायिक व औद्योगिक आस्थापने
विशेष परवानगी दिलेल्यांखेरीज सर्व निवासी हॉटेल, लॉज, बोर्डिंग हाऊस व वसतिगृहांसह ‘हॉस्पिटॅलिटी’ उद्योग
सर्व चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सेमिनार स्थळे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा व जिम, स्वीमिंग पूल, उद्याने, थीम पार्क, बार आणि उपाहारगृहे
अंत्ययात्रेला जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी