CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:30 AM2021-08-28T00:30:50+5:302021-08-28T00:31:17+5:30
आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने वेळो वेळी जारी केलेले आदेश आजपासून लागू होत आहेत. तसे पत्रकही राज्य शासनाने काढले आहे. यानुसार, आता केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी, त्याला कोरोनाची आरटीपीसीआर(RT PCR) टेस्ट करणे बंधनकारक आहे. हाच नियम आता राज्यातही लागू राहील. (CoronaVirus: RT PCR test mandatory for international travellers, Maharashtra govt decides)
आज राज्यात समोर आले ४,६५४ नवे कोरोना रुग्ण -
आलेल्या आकडेवारीनुसार, आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ५७४ इतकी आहे.
आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण
देशात शुक्रवारी कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम नोंदवला गेला. सरकारने सांगितल्यानुसार, आज भारतात 93 लाखांहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एका दिवसात करण्यात आलेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. दरम्यान, देशातील एकून लसीकरणाचा आकडा 62 कोटींच्या पुढे गेला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोशल मिडियावर ही माहिती दिली.
काल केरल (31,645), महाराष्ट्र (5,131), आंध्र प्रदेश- (1,622), तमिळनाडू- (1,604) आणि कर्नाटक- (1,224) या पाच राज्यांत सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते.